‘फडणवीस, शिंदे यांच्यापाठोपाठ अजित पवार ही येतील, म्हणतील, कमळाचं बटन…’ भाजप नेत्याचं सुचक वक्तव्य
यासाठी आता प्रत्येक पक्षाने आपल्या बैठका आणि दौऱ्यांना सुरूवात केली आहे. भाजपकडून मेळावे आणि बुथ पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. याचदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परभणीच्या पाथरी येथे अजित पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.
परभणी, 30 जुलै, 2023 | येत्या काहीच महिन्यानंतर आता लोकसभेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. यासाठी आता प्रत्येक पक्षाने आपल्या बैठका आणि दौऱ्यांना सुरूवात केली आहे. भाजपकडून मेळावे आणि बुथ पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. याचदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परभणीच्या पाथरी येथे अजित पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. यावेळी त्यांनी 2024 च्या निवडणुकीत येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतील त्यांच्यापाठोपाठ आता अजित पवार देखील येतील. ते येथे येऊन कमळाचा बटन दाबा असं तुम्हाला म्हणतील. तर ते भाजपचा प्रचार करतील असं विधान केलं आहे. ज्यामुळे आता चर्चांना उधान आलं आहे. तर हे विधान बावनकुळे यांनी परभणीच्या पाथरी येथे हर घर चलो अभियान योजनेअंतर्गत भाजप वॉर रूमचे उद्घाटनाच्या वेळी केलं.