कुणाचा कुणाला पाठिंबा? शुभांगी पाटील म्हणतात, सांगायला गेले तर...

कुणाचा कुणाला पाठिंबा? शुभांगी पाटील म्हणतात, सांगायला गेले तर…

| Updated on: Jan 26, 2023 | 3:17 PM

जळगाव : नाशिक ( nashik ) येथील पदवीधर मतदारसंघात चुरशीची लढत होत आहे. भाजपने ( bjp ) या निवडणुकीत आपला उमेदवार दिला नाही. मात्र, अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे ( satyjit tambe ) याना भाजप पाठिंबा देण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील ( shubhangi patil ) यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला असून त्या […]

जळगाव : नाशिक ( nashik ) येथील पदवीधर मतदारसंघात चुरशीची लढत होत आहे. भाजपने ( bjp ) या निवडणुकीत आपला उमेदवार दिला नाही. मात्र, अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे ( satyjit tambe ) याना भाजप पाठिंबा देण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील ( shubhangi patil ) यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला असून त्या मतदारांच्या भेटीगाठी घेत आहे.

शुभांगी पाटील यांनी आज जळगावातील चाळीसगाव येथील मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सत्यजित तांबे यांनी कुणाचा पाठिंबा घ्यावा, आणि त्यांना कुणाचा पाठिंबा मिळणार आहे हे त्यांचे त्यांनी पहावं. मी मतदारांशी बांधील आहे.

कुणाचा पाठिंबा कुणाला याबद्दल बोलायचे असेल तर माही सगळेच मेहनत घेत आहोत. जुनी पेन्शन योजनेचे महाराष्ट्रात ३ लाख कर्मचारी आहेत. त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. विनाअनुदानित कृती समितीचा पाठिंबा आहे. अशा  सर्व संघटना सांगायला गेले तर १०० संघटनाचा पाठिंबा आपणाला मिळाला आहे, असे त्या म्हणाल्या. शिवाय मी हाडाची शिक्षिका आहे म्हणून पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Published on: Jan 26, 2023 03:10 PM