VIDEO : विनामास्क फिरली, वरुन क्लीनअप मार्शलला मारहाण, या बेफिकीर महिलेवर कारवाई करा
BMC marshal beatan

VIDEO : विनामास्क फिरली, वरुन क्लीनअप मार्शलला मारहाण, या बेफिकीर महिलेवर कारवाई करा

| Updated on: Mar 19, 2021 | 8:34 PM

मास्क (Mask) न लावल्यामुळे दंड ठोठावणाऱ्या मुंबई क्लीनअप मार्शल महिलेला, एका महिलेने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मुंबई : मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा (Mumbai Corona cases) विस्फोट होत आहे. तरीही अजून काही जण बेफिकीरपणे वागत आहेत. मास्क वापरण्याबाबत कडक निर्बंध लागू करुनही अनेकांना त्याच्याशी देणंघेणं नसल्याचं दिसतंय. मास्क (Mask) न लावल्यामुळे दंड ठोठावणाऱ्या मुंबई क्लीनअप मार्शल महिलेला, एका महिलेने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  ()

कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी मास्क, अंतर राखणे आणि हात धुणे ही त्रिसूत्री पाळणे आवश्यक आहे. नागरिकांनी मास्क वापरावेत, न वापरणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी मुंबईत ठिकठिकाणी महापालिकेकडून मार्शल तैनात करण्यात आले आहेत. जे मास्क वापरत नाहीत त्यांच्यावर दंड ठोठावून पावती फाडण्यात येते.

कांदिवली लिंक रोडवर महावीर नगर सिग्नलजवळ एक विनामास्क फिरणाऱ्या महिलेला, मार्शलने रोखून 200 रुपयांचा दंड ठोठावला. मात्र दंडाबाबत ऐकताच संबंधित महिला थेट मार्शल महिलेच्या अंगावर धावून जाते. वादावादी करुन तिने थेट मार्शल महिलेला मारहाण केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ कांदिवली परिसरातील असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या चारकोप पोलीस या घटनेची चौकशी करत आहे.

VIDEO : विनामास्क महिलेची क्लीनअप मार्शलला मारहाण

Published on: Mar 19, 2021 07:59 PM
Headline | 6 PM | एनआयच्या अहवालानंतर राज्य सरकारची कारवाई – गृहमंत्री
सचिन वाझे प्रकरणामुळे शरद पवार नाराज असल्याची चर्चा, अनिल देशमुखांच गृहमंत्रिपद धोक्यात?