Salman-ShahRukh Khan | भाईजान अन् किंगखान ‘वर्षावर’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पाचं घेतलं दर्शन
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूड विश्वातील लोकप्रिय अभिनेते शाहरुख खान आणि सलमान खान एकत्र... मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावर दाखल होतं घेतलं बाप्पाचं दर्शन, बघा व्हिडीओ
मुंबई, २५ सप्टेंबर २०२३ | राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज राज्यभरात सात दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त भेटीगाठी सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी रविवारी बॉलिवूड विश्वातील प्रसिद्ध अभिनेते शाहरूख खान आणि सलमान खान एकत्र असल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी विराजमान झालेल्या बाप्पाचं शहारूख आणि सलमान खान याने दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यानी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री यांचे पुत्र आणि कल्याण -डोंबिवली मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे हे देखील यावेळी उपस्थित होते. दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शाहरूख खान आणि सलमान खान यांनी फोटोशूट देखील केले.