ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभक्तीपर चित्रपटांसाठी होते प्रसिद्ध
प्रसिद्ध भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे ८७ व्या वर्षी निधन झाले. ते देशभक्तीपर चित्रपटांसाठी प्रसिद्ध होते आणि "भारत कुमार" या नावाने ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीला मोठे नुकसान झाले आहे.
ज्येष्ठ भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे आज शुक्रवारी (4 एप्रिल) सकाळी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला, अशी भावना व्यक्त केली जात आहे. मनोज कुमार हे त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ते ‘भारत कुमार’ या नावाने प्रसिद्ध होते. मनोज कुमार यांनी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच देशभरात शोककळा पसरली आहे. मनोज कुमार हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
Published on: Apr 04, 2025 08:21 AM
Latest Videos
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम

