फरार बुकी जयसिंघांनीला बेड्या तर अमृता फडणवीस यांचे धक्कादायक खुलासे; या प्रकरणाचे धागेदोरे कुठंपर्यंत?

फरार बुकी जयसिंघांनीला बेड्या तर अमृता फडणवीस यांचे धक्कादायक खुलासे; या प्रकरणाचे धागेदोरे कुठंपर्यंत?

| Updated on: Mar 20, 2023 | 11:36 PM

VIDEO | फरार असलेल्या बुकी अनिल जयसिंघानीच्या मुसक्या अवळण्यासाठी पोलिसांनी नेमका कोणता प्लान आखला? यासंदर्भातील बघा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट...

मुंबई : फरार बुकी अनिल जयसिंघांनीला मुंबई पोलिसांनी अखेर अटक केलीय. मुलगी अनिक्षाला अटक केल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा जयसिंघानीकडे वळवला होता. यामध्ये मुंबई पोलिसांना चांगले यशही आले तर दुसरीकडे लाच देण्याचा प्रयत्न आणि ब्लॅकमेलिंगच्या तक्रारीत अमृता फडणवीस यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. गुजरातच्या कलोल इथून फरार बुकी अनिल जयसिंघानीच्या मुंबई क्राईम ब्रांचनं मुसक्या आवळल्यात. तर लाच देण्याचा प्रयत्न आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप करत अमृता फडणवीस यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षाला तात्काळ अटक केली. मात्र 7 वर्षांपासून अनिल जयसिंघांनी यांचा कोणताही पत्ता नसून तो फरार होता. परंतु हा अनिल जयसिंघानी इतक्या सहजासहजी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. फरार जयसिंघानीला पकडण्यासाठी पोलिसांनी नेमका कोणता प्लान आखला? त्याला कसं जाळ्यात पकडलं यासंदर्भातील बघा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Mar 20, 2023 11:34 PM