Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता भारतीय जवान पाकिस्तानात गेला, नेमकं काय घडलं? फोटो पाहून बसेल धक्का
एकीकडे जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झालं असताना आता दुसरीकडे मोठी माहिती समोर आली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यात देखील तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. यासगळ्यात आता एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताच्या बीएसएफ जवानाने चुकीने पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय बीएसएफचा एक जवान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेला आहे. या जवानाचं नाव पूनम कुमार असं असून पाकिस्तानच्या सैन्याने पूनम कुमार यांना ताब्यात घेतलं आहे. बीएसएफ जवान पूनम कुमार श्रीनगरमधील बीएसफच्या यूनिट 24 मध्ये तैनात होते. दरम्यान, बीएसएफ जवान पूनम कुमार चुकीने पाकिस्तानमध्ये शिरल्यानंतर आता या जवानाचे काही धक्कादायक फोटो समोर आले आहेत. पूनम कुमार हे एका गाडीमध्ये बसल्याचे दिसत आहे. इतकंच नाहीतर त्यांच्या डोळ्यावर एक पट्टी बांधण्यात आली असून यावेळी त्यांच्या अंगावर सैन्यातील कपडे परिधान केल्याचे पाहायला मिळतंय.

पाकिस्तानात झालेल्या नुकसानासाठी ते स्वत:च जबाबदार - ए. के. भारती

नागरी-लष्करी समन्वयासंदर्भात 'वर्षा'वर बैठक, CM म्हणाले, मी सॅल्यूट...

पंतप्रधान मोदींचं कौतुक करत गुलाबराव पाटलांची शेरोशायरी

Kohli Retirement : कसोटीतील 'विराट' पर्व संपलं, जाणून घ्या बरंच काही
