लहानपणात डोळे मारले नसतील, म्हणून या वयात…; अजित पवार यांच्यावर सत्तारांची खोचक टीका
अजित पवार हे विरोधी पक्ष नेते असल्याने त्यांच्या बोलण्याला महत्व हे असतच असाही टोमणा त्यांनी मारला आहे. तसेच ते गौमतीवर असं का बोलले हे माहीत नाही.
छत्रपती संभाजीनगर : अर्थसंकल्प अधिवेशनावेळी (Budget Session) विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यात ते कोणालातरी डोळा मारताना दिसत होते. त्यावरून बरीच चर्चा झाली होती. त्याच मुद्द्यावरून आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना पुन्हा छेडलं आहे. ज्यांचं वय डोळे मारायचे आहे ते डोळे मारतात, ज्यांनी लहानपणी डोळे मारले नाहीत, ते आता मारत आहेत, असा चिमटा सत्तार यांनी काढला. त्यामुळे एकच चर्चा रंगली आहे. तसचे अजित पवार हे विरोधी पक्ष नेते असल्याने त्यांच्या बोलण्याला महत्व हे असतच असाही टोमणा त्यांनी मारला आहे. तसेच ते गौमतीवर असं का बोलले हे माहीत नाही. पण आपण गौतमी पाटीलचा पुन्हा कार्यक्रम ठेऊ आणि अजित पवार यांना बोलवू असेही ते म्हणाले आहेत.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश

