Sindhudurg | कणकवलीत बाजाराच्या दिवशी औषध दुकानात चक्क शिरला बैल!

Sindhudurg | कणकवलीत बाजाराच्या दिवशी औषध दुकानात चक्क शिरला बैल!

| Updated on: Feb 02, 2022 | 12:43 PM

सिंधुदुर्गा(Sindhudurg)तल्या कणकवली(Kankavli)त काल बाजाराच्या दिवशी एका औषध दुकानात चक्क बैल (Bull) शिरला. अचानकपणे दुकानात बैल शिरल्यामुळे दुकान मालकाची व कामगारांची धांदल उडाली. सर्वजण घाबरून दुकानाबाहेर पळाले. नंतर त्या बैलाला उसकावून लावण्यात आलं.

सिंधुदुर्गा(Sindhudurg)तल्या कणकवली(Kankavli)त काल बाजाराच्या दिवशी एका औषध दुकानात चक्क बैल (Bull) शिरला. अचानकपणे दुकानात बैल शिरल्यामुळे दुकान मालकाची व कामगारांची धांदल उडाली. सर्वजण घाबरून दुकानाबाहेर पळाले. नंतर त्या बैलाला उसकावून लावण्यात आलं आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. काल सायंकाळची ही गोष्ट असून काल कणकवलीचा आठवडा बाजाराचा दिवस होता. बाजारात गर्दी असतानाच हा बैल चक्क दुकानात शिरून काउंटरजवळ जाऊन थांबला. अचानक बेधडक बैल दुकानात शिरल्यामुळे कामगारांची अक्षरशः तारांबळ उडाली. दुकानात शिरलेल्या बैलाला पाहण्यासाठी बघ्यांची ही चांगलीच गर्दी जमली. कामगारांनी प्रसंगावधान राखत दुकानातून बाहेर पळ काढला. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने बैलाला हुसकावून लावण्यात यश आले. मात्र दुकानात शिरलेल्या या बैलाची चर्चा कणकवलीत चांगलीच रंगली होती.