Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थांनी केली पाहा कमाल, असं काय बनवलं ज्याने मिळेल दुर्गम भागात मदत

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थांनी केली पाहा कमाल, असं काय बनवलं ज्याने मिळेल दुर्गम भागात मदत

| Updated on: Aug 08, 2023 | 12:07 PM

दुर्गम ठिकाणी मदत पोहचवण्यासाठी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थांनी अनोखा ड्रोन बनवलाय.

पुणे, 8 ऑगस्ट 2023 | माळीणप्रमाणे संपूर्ण इर्शाळवाडी गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. ईर्शाळवाडी गाव दुर्गम ठिकाणी वसलेले असल्यामुळे बचावकार्य करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या भागात औषधे आणि काही साहित्य घेऊन जाण्यासाठीही अडचण झाली. दरम्यान अशा दुर्गम ठिकाणी मदत पोहचवण्यासाठी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थांनी अनोखा ड्रोन बनवलाय. हा चार किलो वजनाचा हा ड्रोन 12 किलोपर्यंत वजन उचलू शकतो. चेन्नईत ‘सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर इंडिया’ तर्फे साउथर्न सेक्शन ड्रोन डेव्हलपमेंट चॅलेंज स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आला.

Published on: Aug 08, 2023 12:07 PM