Eknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत मंत्रिपदावरून रस्सीखेच, ‘या’ 5 नेत्यांना पक्षातूनच होतोय विरोध?
भाजपच्या वाट्याला २०, शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला १२, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला १० मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये मंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
महायुती सरकारचं सरकार येऊन आता आठवडा होईल मात्र अद्याप राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. तर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असल्याने सत्ताधारी आमदारांसह इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. अशातच कोणा-कोणाला महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागले आहे. भाजपच्या वाट्याला २०, शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला १२, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला १० मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये मंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळत आहे. तर शिंदे गटातूनच पाच मंत्र्यांच्या नावाला विरोध केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या पाच नेत्यांमध्ये मंत्री अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील यांचा समावेश असल्याचे माहिती आहे. यासह शिंदे गटातील अंतर्गत कलहाचा फटका पाच माजी मंत्र्यांना बसण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास पाच जणांना पुन्हा संधी मिळेल याचा अर्थ निम्म्या मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.