रविकांत तुपकर यांच्या पत्नीला अटक होणार? शर्वरी तुपकर यांच्यासह 30 ते 40 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल
शेतकर्यांचा हक्क मागणार्या अॅड. शर्वरी तुपकर यांच्यासह आंदोलक शेतकर्यांवर मात्र पोलिसांनी मलकापूर शहर पोलीस ठाणे तसेच मेहकर पोलीस ठाण्यात ३० ते ४० शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांत लवकरच संबंधित शेतकरी तसेच अॅड. शर्वरी तुपकर यांना अटक केली जाण्याची शक्यता
बुलढाणा, २१ जानेवारी, २०२४ : सोयाबीन आणि कापसाला दरवाढ, पीकविमा, शेतीपिकांची नुकसान भरपाई मागण्यासाठी मलकापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा देणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी आंदोलनापूर्वीच अटक केली आहे. तर त्यांना रात्रभर पोलीस ठाण्यात डांबले होते. त्यांची बुलढाणा जिल्हा न्यायालयाने सुटका केली असली तरी तुपकरांच्या नंतर हे आंदोलन रविकांत तुपकर यांनी पत्नी अॅड. शर्वरी तुपकर या पुढे नेणार आहेत. शेतकर्यांचा हक्क मागणार्या अॅड. शर्वरी तुपकर यांच्यासह आंदोलक शेतकर्यांवर मात्र पोलिसांनी मलकापूर शहर पोलीस ठाणे तसेच मेहकर पोलीस ठाण्यात ३० ते ४० शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांत लवकरच संबंधित शेतकरी तसेच अॅड. शर्वरी तुपकर यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. ज्या कलमाखाली हे गुन्हे दाखल झाले ते पाहाता पोलिसांना तुपकर दाम्पत्याला जिल्ह्याबाहेर हद्दपार करायचे का? असा सवाल शेतकरी करत आहेत.