CBSE Board | सीबीएसई बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर, किती टक्के लागला रिझल्ट अन् कोणी मारली बाजी?
VIDEO | सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर, कोणत्या वेबसाईटवर पाहता येणार रिझल्ट?
नवी दिल्ली : : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता १२ वी बोर्डाचा निकाल आज जाहीर केला आहे. यंदा सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल हा ८७.३३ टक्के लागला आहे. CBSE बोर्डाच्या १२ वीचे विद्यार्थी आपला निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट, results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in वर जाऊन पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाकावी लागेल. ही माहिती वेबसाईवर भरल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल जाणून घेता येईल. जाहीर झालेल्या निकालात एकूण ८७.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालाचे प्रमाण हे ५ टक्के कमी झाल्याचे समोर आले आहे. त्रिवेंद्रम झोनने ९९.९१ टक्क्यांसह सर्वोत्तम कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे यंदा मुलींचा निकाल मुलांपेक्षा चांगला लागला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल हा ६ टक्के चांगला लागला आहे. मुलांचा निकाल ८४.६७ टक्के, तर मुलींचा निकाल ९०.६८ टक्के लागला आहे.