बारामतीनंतर शिरूर मतदारसंघाच्या स्ट्राँगरूममध्ये धक्कादायक प्रकार, CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् …
बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रकारानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी वापरण्यात आलेले ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्येही सीसीटीव्ही डिस्प्ले बंद असल्याची माहिती समोर आली आहे. EVM मशीन ठेवलेल्या जागेवरील CCTV चा डिस्प्ले २४ तास बंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघड
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी ११ जागांवर पार पडलं. या चौथ्या टप्प्यात नंदूरबार, जळगाव, रावेर,जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, नगर शिर्डी आणि बीड या ठिकाणी पार पडलं. दरम्यान, या टप्प्यातील मतदान पार पडत असताना शिरूर मतदारसंघातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रकारानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी वापरण्यात आलेले ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्येही सीसीटीव्ही डिस्प्ले बंद असल्याची माहिती समोर आली आहे. EVM मशीन ठेवलेल्या जागेवरील CCTV चा डिस्प्ले २४ तास बंद असल्याचा धक्कादायक प्रकार शिरूर मतदारसंघाच्या स्ट्रॉंगरुममध्ये घडलाय. दरम्यान, EVM मशीनवरील सीसीटीव्ही डिस्प्ले २४ तास बंद होते. हा सगळा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने सीसीटीव्ही डिस्प्ले सुरू केलेत.