लोकसभेसोबतच राज्यांच्या निवडणुका घेण्यासाठी केंद्राच्या हालचाली, किती राज्यांच्या होणार निवडणुका?

लोकसभेसोबतच राज्यांच्या निवडणुका घेण्यासाठी केंद्राच्या हालचाली, किती राज्यांच्या होणार निवडणुका?

| Updated on: Sep 01, 2023 | 11:33 PM

tv9 Special Report | लोकसभेसोबतच राज्यांच्या निवडणुका घेण्यासाठी केंद्राकडून हालचाली सुरु, विधेयक पास झालं तर किती राज्यांच्या निवडणुका लोकसभेसोबत होऊ शकतात? पाहा tv9 चा EXCLUSIVE रिपोर्ट

मुंबई, १ सप्टेंबर २०२३ | लोकसभेसोबतच राज्यांच्या निवडणुका घेण्यासाठी केंद्रानं हालचाली सुरु केल्यात. त्यासंदर्भातलं विधेयकही आणण्याची तयारी केंद्रानं सुरु केली आहे. मात्र विधेयक पास झालं तर किती राज्यांच्या निवडणुका लोकसभेसोबत होऊ शकतात? ते जाणून घेऊया… वन नेशन, वन इलेक्शनसाठी मोदी सरकारनं एक पाऊल पुढे टाकलंय. लोकसभेसोबतच, राज्यांच्या निवडणुकाही घेण्यासाठी त्यासंदर्भातलं विधेयकच मोदी सरकार विशेष अधिवेशनात आणणार आहे. 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन होणार असून त्याआधी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेत एक समिती स्थापन केलीय. वन नेशन, वन इलेक्शनद्वारे कशा प्रकारे राज्यांच्याही निवडणुका सोबत घेता येईल याचा अहवाल सादर केला जाईल. लोकसभेसोबतच राज्यांच्या निवडणुका घेण्यासाठी कोणत्या कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील? तसंच ही समितीच देशभरात जनमतंही जाणून घेऊन अहवाल तयार करेल. आता जर राज्यांच्याही निवडणुका एकत्रच घ्यायचं झाल्यात तर त्यासाठी 2 टप्पे असू शकतात. ते टप्पे कोणते? बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Sep 01, 2023 11:33 PM