‘घरात बसून मुख्यमंत्र्यांनी माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढचं केलं’
"कोविड काळापासून मुख्यमंत्री दोन वर्ष मंत्रालयात येऊ शकले नाही. घरात बसून त्यांनी माझ कुटुंब-माझी जबाबदारी एवढीच घोषणा केली. त्या पलीकडे काहीही केलेलं नाही"
मुंबई: “माझ कुटुंब-माझी जबाबदारी एवढचं मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्य सरकार ओबीसी, धनगर आणि मराठा आरक्षणाचं मारेकरी आहे” अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. “या सरकारला सामाजिक, आर्थिक प्रश्न सोडवायचे नाहीत. विकासाकडे दुर्लक्ष करुन वेगळे प्रश्न निर्माण करायचे. जनतेचं लक्ष विकासापासून विचलित करायचं हेच या सरकारचं धोरण आहे” अशी टीका दानवेंनी केली. “कोविड काळापासून मुख्यमंत्री दोन वर्ष मंत्रालयात येऊ शकले नाही. घरात बसून त्यांनी माझ कुटुंब-माझी जबाबदारी एवढीच घोषणा केली. त्या पलीकडे काहीही केलेलं नाही. राज्यातील 12 कोटी जनता हे मुख्यमंत्र्याचं कुटुंब आहे. हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलय, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.
Published on: May 30, 2022 02:44 PM
Latest Videos