आता मंत्रालयात निवेदन, तक्रार देण्यासाठी तासन् तास सामान्यांचा खोळंबा होणार नाही, कारण...

आता मंत्रालयात निवेदन, तक्रार देण्यासाठी तासन् तास सामान्यांचा खोळंबा होणार नाही, कारण…

| Updated on: Apr 10, 2023 | 9:42 PM

VIDEO | नागरिकांचे अर्ज, तक्रार स्वीकारण्यासाठी मंत्रालयात उभारण्यात येणार मध्यवर्ती टपाल कक्ष, कधी होणार कार्यन्वित?

मुंबई : मंत्रालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांना त्यांचं निवेदन, अर्ज आणि तक्रार देण्यासाठी आता तासन् तास थांबून राहण्याची गरज नाही तर मंत्रालयाच्या माध्यमातून मध्यवर्ती टपाल कक्षाची व्यवस्था लवकरच करण्यात येणार आहे. त्याचीच तयारी सध्या सुरू आहे. १ मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती टपाल कक्ष कार्यन्वित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री, मंत्र्यांपासून ते सचिवांपर्यंत ३८ विभागांची मंत्रालयात रोज साधारण ४० हजारांपेक्षा अधिक पत्र येतात. लोकं पत्र निवेदन अर्ज घेऊन आल्याने मंत्रालयात मोठ्या प्रमाणात गर्दी देखील पाहायला मिळते. त्यामुळे ही गर्दी कमी करण्याकरता आणि सामान्यांचा त्रास कमी करण्यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती टपाल कक्ष उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कक्षाचे १ मे रोजी उद्घाटन केले जाणार आहे.

Published on: Apr 10, 2023 09:42 PM