Central Railway : मुसळधार पावसाचा मध्य आणि पश्चिम रेल्वेला फटका, लोकल विस्कळीत अन्...

Central Railway : मुसळधार पावसाचा मध्य आणि पश्चिम रेल्वेला फटका, लोकल विस्कळीत अन्…

| Updated on: Sep 25, 2024 | 10:45 PM

मध्य आणि पश्चिम रेल्वेला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे, अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना मोठी गैरसोय झाल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यभरात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मुंबईत गेल्या दोन ते तीन तासांपासून मुसळधार पाऊस कोसळताना दिसतोय. मुंबईतील या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे वाहतुकीला बसला असल्याचे पाहायला मिळाले. मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहे. त्यामुळे संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतत असताना प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून मोठ्या अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे. विजांच्या कडकडाट अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. अर्धा पाऊण तास लोकल ट्रेन उशिराने धावत असल्याने मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईसह उपनगरात देखील पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय. हवामान विभागाकडून मुंबईसाठी उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी केला असून त्यानंतर उद्या दिवसभरासाठी ऑरेंज अलर्ट असणार आहे. मुंबईसह ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना देखील उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Published on: Sep 25, 2024 10:45 PM