देवेंद्र फडणवीस लावालाव्या करण्यात एक्सपर्ट झालेत; ठाकरे गटाच्या नेत्याची घणाघाती टीका

देवेंद्र फडणवीस लावालाव्या करण्यात एक्सपर्ट झालेत; ठाकरे गटाच्या नेत्याची घणाघाती टीका

| Updated on: Feb 14, 2023 | 3:14 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना ठाकरेगटाचे नेते चंद्रकांत खैरे टीका केली आहे. तसंच राज्यातील सत्तासंघर्षावरही खैरे बोललेत. पाहा व्हीडिओ...

औरंगाबाद : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना ठाकरेगटाचे नेते चंद्रकांत खैरे टीका केली आहे. “देवेंद्र फडणवीस लावालाव्या करण्यात पटाईत झाले आहेत. तुम्ही शिंदे गटाच्या आमदारांकडे लक्ष देऊ लागलेत. त्यापेक्षा लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या. महागाईचा बंदोबस्त करा, तुमचं इकडं लक्ष नाही”, असं चंद्रकांत खैरे म्हणालेत. राज्यातील सत्तासंघर्षावरही खैरे बोललेत. “कपील सिब्बल हे आमची भुमिका मांडत आहेत; आमचं सर्वांच लक्ष सुनावणीकडे आहे.आमची परमेश्वराला विनंती आहे हा निकाल आमच्या बाजूने लागावा. ज्यांनी बंडखोरी केली, त्यांच्या बाजूने निकाल लागला तर राजकीय अराजकता निर्माण होईल. आमची बाजू सत्याची आहे, सत्याचा विजय होईल”, असं चंद्रकांत खैरे म्हणालेत.

Published on: Feb 14, 2023 03:14 PM