नितेश राणे शेंबडा अन् फालतू माणूस, त्याला अक्कलच नाही, ठाकरे गटाच्या नेत्याचा राग अनावर
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सर्वजण सोंगाडे आणि 420 आहेत, असे म्हणत भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. यावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाष्य केले आहे. यावेळी चंद्रकांत खैरे यांनी नितेश राणे यांची अक्कल काढली
संभाजीनगर, १५ नोव्हेंबर २०२३ | उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सर्वजण सोंगाडे आणि 420 आहेत, असे म्हणत भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. यावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाष्य केले आहे. नितेश राणेचा बाप उद्धव ठाकरे यांच्या पुढे झुकून नमस्कार करतो आणि हा पोट्टा काहीही बोलतो. नितेश राणे यांच्या बोलण्याचा फटका हा भाजपला बसू शकतो. तर नितेश राणे हा फालतू माणूस आहे, असे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. चंद्रकांत खैरे म्हणाले, ‘नितेश राणे फालतू माणूस आहे, त्याला कळत नव्हतं शेंबडा होता. लहानपणी बापासोबत मातोश्रीमझ्ये जायचा मी पाहिलंय त्याला… आता फार अक्कल आलीय का त्याला?’ असा सवाल करत चंद्रकांत खैरे यांचा राग अनावर झाल्याचे पाहायला मिळाला. तर आता नितेश राणे निवडून येणार नाही. आमचं कोकण आता मजबूत झालं आहे. आदरपूर्वक बोलायला हवं, आता तोंड सांभाळून बोलायचं, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी नितेश राणे यांना इशाराच दिला आहे.

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग

इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी

पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?

भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
