Video: गैरसमज करून घेऊ नका, दहीहंडीला खेळाचा दर्जा दिलाय, आरक्षण नव्हे- चंद्रकांत पाटील

Video: गैरसमज करून घेऊ नका, दहीहंडीला खेळाचा दर्जा दिलाय, आरक्षण नव्हे- चंद्रकांत पाटील

| Updated on: Aug 20, 2022 | 2:38 PM

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात बोलताना दहीहंडीला (Dahihandi) खेळाचा दर्जा दिल्याचं स्पट केलं आहे. आरक्षण दिलेलं नाही, तर दहीहांडी खेळ नव्याने अॅड केला, उद्या मंगळागौर-विटी दांडूलाही मान्यता मिळू शकते, त्यात अयोग्य काय? असा सवाल त्यांनी केलाय.”एखाद्या निर्णयाचा अभ्यास करण्यापूर्वीच बोलणं सुरू केलं जातं आधीच राज्यात खेळामध्ये आरक्षणाचा कायदा आहे. खेळामधील 5 […]

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात बोलताना दहीहंडीला (Dahihandi) खेळाचा दर्जा दिल्याचं स्पट केलं आहे. आरक्षण दिलेलं नाही, तर दहीहांडी खेळ नव्याने अॅड केला, उद्या मंगळागौर-विटी दांडूलाही मान्यता मिळू शकते, त्यात अयोग्य काय? असा सवाल त्यांनी केलाय.”एखाद्या निर्णयाचा अभ्यास करण्यापूर्वीच बोलणं सुरू केलं जातं आधीच राज्यात खेळामध्ये आरक्षणाचा कायदा आहे. खेळामधील 5 टक्के आरक्षण आधीच सगळ्या जातींना आहे. आधी जे खेळ यात होते त्यात हा एक खेळ जोडला गेला आहे. त्यात कुठलीही अधिकच आरक्षण दिलं नाही. फक्त नवा खेळ जोडला आहे. तशी कुणी विटी दांडू आरक्षणात जोडण्याची मागणी केली तर तोही जोडू. सगळ्या गोष्टी सोप्या असताना त्या अवघड करून समाजाची दिशाभूल केली जात आहे. कुणी मागणी केली तर मंगळागौर देखील यात जोडू”, असंही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले आहेत.

Published on: Aug 20, 2022 02:38 PM