टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी का नाही? चंद्रकांत पाटील यांनी पक्षाची भूमिका सांगितली…
पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केलेत. यात हेमंत रासने आणि अश्विनी जगताप या दोघांना भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
पुणे : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केलेत. यात हेमंत रासने आणि अश्विनी जगताप या दोघांना भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. पण कसब्यातून मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी का देण्यात आली नाही, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होतेय. त्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणाल टिळकला यांना भाजपचं प्रवक्तेपद दिलंय.आम्ही टिळक कुटुंबियांसोबत आहोत. कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली तर विरोधक ही पोटनिवडणुक बंद करतील. पोटनिवडणुकीची गणितं वेगळी असतात, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.
Published on: Feb 04, 2023 01:14 PM
Latest Videos