अजित पवार यांनी 'ती' मागणी करताच, जयंत पाटील यांच्या बँकेवर ईडीची धाड, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

“अजित पवार यांनी ‘ती’ मागणी करताच, जयंत पाटील यांच्या बँकेवर ईडीची धाड”, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

| Updated on: Jun 26, 2023 | 2:56 PM

जिल्हा परिषदेतील सभागृहात मोदी @9 वर्षपूर्ती निमित्त भाजपची जाहीर सभा पार पडली. या सभेस राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,विधानपरिषद गट नेते प्रवीण दरेकर, शिवेंद्रराजे भोसले,जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी चंद्रकात पाटील यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.

सातारा: जिल्हा परिषदेतील सभागृहात मोदी @9 वर्षपूर्ती निमित्त भाजपची जाहीर सभा पार पडली. या सभेस राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,विधानपरिषद गट नेते प्रवीण दरेकर, शिवेंद्रराजे भोसले,जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी चंद्रकात पाटील यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. “सध्या अजित पवार पक्षातून जातात की राहतात या चिंत पवार साहेब आहेत. अजित पवार रोज नवीनच बोलत आहेत.आता तर ते म्हणाले मला विरोधी पक्षनेते पदा पक्षा पक्षाची जबाबदारी द्या. अजित पवार हे बोलतात तोपर्यंत त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांच्या बँकेवर ईडीची धाड पडली. यामध्ये भरपुर काही सापडलं आहे अस म्हणलं जातंय.त्यांचा मंत्री असतानाचा लॉटरी घोटाळा पण सापडला आहे.म्हणजे हा घोटाळा सापडणार होता म्हणून अजित पवारांनी मागणी केली होती का ? कारण अजित पवारांना माहित होत की दोन दिवसांनी अध्यक्षांना पदावरून काढावे लागेल,” असा गौप्यस्पोट चंद्रकांत पाटील यांनी या वेळी बोलत असताना केला.

Published on: Jun 26, 2023 02:56 PM