बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच म्हटले..
महायुतीमध्ये आमचं नातं फार घट्ट नाही, असं वक्तव्य प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केलं. बच्चू कडू यांच्या या वक्तव्यानंतर बच्चू कडू आणि महायुतीतील घटकपक्ष नाराज असल्याच्या चर्चांवर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचं भाष्य, म्हणाले, एखाद्या कुटुंबात जो मुलगा हट्ट करतो पण तो शिस्तीच्या बाहेर नसतो. असे बच्चू कडू आहेत.
अमरावती, ४ जानेवारी २०२४ : महायुतीमध्ये आमचं नातं फार घट्ट नाही, असं वक्तव्य प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केलं. बच्चू कडू यांच्या या वक्तव्यानंतर बच्चू कडू आणि महायुतीतील घटकपक्ष नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी या नाराजीच्या चर्चांवर भाष्य केले आहे. एखाद्या कुटुंबात जो मुलगा हट्ट करतो पण तो शिस्तीच्या बाहेर नसतो. असे बच्चू कडू आहेत ते मनात आलं की बोलून टाकतात. त्यामुळे बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार अशी चर्चा सुरू होते. मात्र बच्चू कडू हे महायुतीतुन बाहेर पडणार नाहीत, असे थेट वक्तव्य अमरावतीत चंद्रकांत पाटील यांनी केलं. तर विरोधक हे बच्चू कडू नाराज आहेत, ते महायुतीतून बाहेर पडणार अशा चर्चा करून मनातले मांडे खात आहे असं त्यांनी म्हटलं आणि विरोधकांना चंद्रकांत पाटील यांनी खोचक टोला लगावला.