केंद्रीय मंत्र्यांना कोणी अटक करू शकत नाही, चंद्रकांत पाटलांकडून नियमांचा दाखला

केंद्रीय मंत्र्यांना कोणी अटक करू शकत नाही, चंद्रकांत पाटलांकडून नियमांचा दाखला

| Updated on: Aug 24, 2021 | 11:27 AM

महाराष्ट्रातील राजकीय जीवन सुसंस्कृत होतं. त्यावर काय चालू आहे. राज्यातील सर्व पक्षाच्या प्रमुखांनी एकत्रं बसून चर्चा केली पाहिजे, असं सांगतानाच मी राणेंच्या वाक्याचं समर्थन करत नाही. पण त्यांची शैली आहे. कोकणात ज्या पद्धतीने बोललं जातं तो अनादर नसतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

राणे साहेबांची त्यांची स्वत:ची एका कार्यपद्धती आहे, बोलण्याची स्टाईल आहे. रावसाहेब दानवेंची एक वेगळी स्टाईल आहे. त्यामधून एखादा आक्षेपार्ह शब्द आला असेल तर केंद्रीय मंत्र्याला थेट अटक होऊ शकते का? त्यावर काही समज देणं, म्हणणं हा भाग आहे की नाही. गेल्या तीन दिवसांपासून खासदार विनायक राऊत हेदेखील नारायण राणे यांच्यावर टीका करतच आहेत, याकडे चंद्रकांत पाटील यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

गेल्या 20 महिन्यात जे सुडबुद्धीने सुरू आहे. त्याची यादी करत आहे. ते कशात बसत आहे. महाराष्ट्रातील राजकीय जीवन सुसंस्कृत होतं. त्यावर काय चालू आहे. राज्यातील सर्व पक्षाच्या प्रमुखांनी एकत्रं बसून चर्चा केली पाहिजे, असं सांगतानाच मी राणेंच्या वाक्याचं समर्थन करत नाही. पण त्यांची शैली आहे. कोकणात ज्या पद्धतीने बोललं जातं तो अनादर नसतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.