संजय राऊत यांचा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर ‘ट्विट बॉम्ब’, आरोपांवर स्पष्टीकरण दिल्यानंतर पुन्हा राऊतांचा इशारा

| Updated on: Nov 21, 2023 | 10:24 AM

संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा चीनमधील मकाऊ येथे असणाऱ्या कॅसिनोमधील एक फोटो शेअर केला आणि त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटले की, महाराष्ट्र पेटलेला असताना हे महाशय मकाऊमध्ये जुगार खेळताय, राऊतांनी केलेले आरोप बावनकुळे यांनी फेटाळले

मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३ : रोज सकाळी पत्रकार परिषद घेत भाजप आणि सरकारवर तुटून पडणाऱ्या संजय राऊत यांनी ट्वीट करून एकच खळबळ उडवली. मकाऊमधील चंद्रशेखऱ बावनकुळे यांचा फोटो शेअर करून साडे तीन कोटी रूपये उडवल्याचा आरोपही केला. यानतंर बावनकुळे यांनी मकाऊमधील कुटुंबासोबतचा फोटो शेअर करत संजय राऊत यांनी केलेले हे आरोप फेटाळून लावले आहेत. मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो असल्याचेही त्यांनी म्हटले. तर यास्पष्टीकरणानंतर संजय राऊत यांनी पुन्हा इशारा दिलाय. जेवढं खोटं बोलाल तेवढं फसाल…संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Published on: Nov 21, 2023 10:24 AM
हेच का अच्छे दिन? संजय राऊत यांनी नाव न घेता कुणावर साधला निशाणा?
आरक्षणावरून पुन्हा खडाजंगी, भुजबळांच्या ‘त्या’ आरोपांवर जरांगे पाटील आक्रमक, काय केला पलटवार?