Swargate Bus Rape : आरोपी दत्ता गाडेची गुगल हिस्ट्री चेक अन् वारंवार पॉर्न… आरोपपत्रातून धक्कादायक माहिती उघड
पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून एक आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आरोपी दत्ता गाडे विरोधात तब्बल ८९३ पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं. शिवाजी नगरमधील सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे.
पुणे स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे विरोधात ८९३ पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ५२ दिवसांमध्ये हा तपास आता पूर्ण केला आहे. फेब्रुवारी महिन्यात स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर बलात्काराची घटना घडली होती. ज्यावेळी पिडीता फलटणला जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना आरोपी दत्ता गाडेने तिला फसवून बसमध्ये नेलं. आरोपी गाडेने पिडीतेला जबरदस्तीने सीटवर ढकललं. पिडीता वाचवा म्हणत जोरात ओरडली, पण बसचे दरवाजे बंद असल्याने आवाज बाहेर गेला नाही. आरोपी गाडेने तिचं तोंड दाबून जबरदस्ती पिडीतेवर लैंगिक आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या आरोपीची ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आरोपी गाडे आणि पिडीता यांच्या डीएनए तपासणीचे अहवाल प्राप्त झाले. पिडीतेने झालेल्या घटनेची माहिती कंडक्टर आणि ड्रायवरला दिली होती. शिवशाही बसमध्ये ओरडल्याचा आवाज बाहेर येत नसल्याचं साउंड इंजिनिअर यांनी स्पष्ट केलं आहे. तर धक्कादायक म्हणजे आरोपीच्या जीमेलची गुगल सर्च हिस्ट्री तपासण्यात आली ज्यात आरोपी वारंवार पोर्न व्हिडिओ पाहत असल्याचं निष्पन्न झालं आहे.

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड

पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती

विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!

मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
