Chembur Crime : चेंबुरमध्ये गोळीबाराचा थरार! आज्ञातांनी बांधकाम व्यावसायिकावर दोन गोळ्या झाडल्या
Mumbai Crime News : चेंबुरमध्ये काल रात्री एका बांधकाम व्यवसायिकावर अज्ञातांनी हल्ला करून गोळीबार केला आहे. यात बांधकाम व्यावसायिक गंभीर जखमी आहे.
चेंबूरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची माहिती आहे. दोघा बाईकस्वारांनी त्याच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या बांधकाम व्यावसायिकावर रात्री 9.50 वाजता दोन गोळ्या झाडण्यात आल्या. चेंबुरच्या मैत्री पार्कजवळ ही घटना घडली. सद्रुद्दीन खान (वय 50) असं गोळीबार करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा गोळीबार का आणि कुणी केला हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
Published on: Apr 10, 2025 08:32 AM
Latest Videos
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम

