सुहास कांदेंकडून समीर भुजबळांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ, छगन भुजबळ म्हणले...

सुहास कांदेंकडून समीर भुजबळांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ, छगन भुजबळ म्हणले…

| Updated on: Oct 29, 2024 | 1:35 PM

नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये असला तरी राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ याने नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. या मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार सुहास कांदेंना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे तर राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते छगन भुजबळ यांचा पुतण्या आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नांदगावमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. समीर भुजबळांच्या सभेमध्ये नांदगांव लोकशाही धडक मोर्चाचे पदाधिकारी शेखर पगार यांनी आमदार सुहास कांदे दहशत पसरवून दादागिरी करताय असा आरोप केला. समीर भुजबळांच्या सभेतच शिवीगाळाची रेकॉर्डिंग उपस्थितांना ऐकवली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे समन्वयक विनोद शेलारांवर सुहास कांदे संतापल्याचेही पाहायला मिळाले. यावरून छगन भुजळांनी सुहास कांदेंवर निशाणा साधलाय. भुजबळ म्हणाले, विनोद शेलार आणि समीर भुजबळांना शिव्या देण्यात आल्या. म्हणूनच भयमुक्त नांदगाव ही टॅगलाईन समीरने घेतली आहे. या क्लिप ऐकल्या तर का घेतली आहे हे सर्वांना कळेल. सामान्य जनता काही बोलू शकणार नाही असे आहे. पोलिसांनी आणि महसूल विभागाने कारवाई करायला पाहिजे. अधिकारी दबावा खाली काम करत आहे. निवडणूक आयोगाने लक्ष दिले पाहिजे. योग्य ती कारवाई केली पाहिजे. निवडणूक आयोगाने भेदभाव करता कामा नये, असेही मत भुजबळांनी व्यक्त केले.

Published on: Oct 29, 2024 01:35 PM