कुणबी दाखल्यांवरून छगन भुजबळ यांचा हल्लाबोल, थेट सरकारवरच शाब्दिक वार

कुणबी दाखल्यांवरून छगन भुजबळ यांचा हल्लाबोल, थेट सरकारवरच शाब्दिक वार

| Updated on: Nov 07, 2023 | 11:42 AM

मराठ्यांना देण्यात येणाऱ्या कुणबी दाखल्यांच्या वाटपावरून मंत्री छगन भुजबळ यांचा विरोध. तर नोंदीच्या आकड्यांवरूनही भुजबळांनी केली शंका उपस्थित, कुणबी दाखल्यांचं वाटप बेकायदेशीर असून ओबीसी आरक्षण संपवण्याचा प्रकार सुरू, भुजबळ यांची स्वतःच्या सरकारवर टीका

मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३ | ज्या कुणबी नोंदीच्या आधारे ज्या मराठ्यांना कुणबी दाखल्यांचे वाटप सुरू आहे. त्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार विरोध दर्शविला. इतकंच नाही तर नोंदीच्या आकड्यांवरूनही भुजबळांनी शंका उपस्थित केली आहे. तर कुणबी दाखल्यांचं वाटप बेकायदेशीर असून ओबीसी आरक्षण संपवण्याचा प्रकार सुरू असल्याची टीकाही भुजबळ यांनी स्वतःच्या सरकारवर केलीय. मराठ्यांना देण्यात येणाऱ्या कुणबी दाखल्यांवरून छगन भुजबळ यांनी सरकारवर शाब्दिक वार केलेत. मराठा आरक्षण देता येत नसल्याने कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचा आरोप भुजबळांनी सरकारवर केलाय. जरांगे यांच्या उपोषणस्थळी सरकारच्या शिष्टमंडळाआधी निवृत्त न्यायमूर्ती दाखल झाले होते. यावेळी त्यांनी जरांगेंना आरक्षणाची प्रक्रिया समजावून सांगितली. मात्र नि. न्यायमूर्ती मनोज जरांगेंच्या पाया पडतात, असा आरोप भुजबळ यांनी केला. बघा काय म्हणाले छगन भुजबळ?

Published on: Nov 07, 2023 11:41 AM