राहुल गांधी यांचं वक्तव्य अन् ओबीसींचा कथित अवमान प्रकरण; छगन भुजबळ यांची सविस्तर प्रतिक्रिया
Chhagan Bhujbal on Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी ओबीसींचा अपमान केला असल्याची टीका होत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा ते नेमकं काय म्हणालेत...
मुंबई : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. राहुल गांधी यांनी ओबीसींचा अपमान केला असल्याची टीका होत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांच्या सदस्यत्व रद्द होण्याचा आणि ओबीसींचा काहीही संबंध नाही. असं आहे तर मग नरेंद्र मोदी साहेबांनी इम्पिरिकल डेटा का दिला नाही. तुम्ही ओबीसी लोकांना पाठिंबा का दिला नाही? जे लोक बाहेर पळून गेले. ते ओबीसी नाहीतच, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
Published on: Mar 26, 2023 03:30 PM
Latest Videos