मंत्रिमंडळातून हकालपट्टीच्या टीकेवर छगन भुजबळ अखेर बोलले; म्हणाले, त्यात दु:ख नाही…
संजय गायकवाड यांनी वापरलेली भाषा ही चुकीची असल्याचेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली होती. सगेसोयरेविरोधात मंत्री छगन भुजबळ हे सरकारविरोधातच आक्रमक झालेत.
मुंबई, २ फेब्रुवारी २०२४ : मला कधीही मंत्रिमंडळातून बाहेर काढू शकतात. मला त्यात दु:ख नाही. मला मंत्रिमंडळाबाहेर काढण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असल्याचे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या टीकेवर छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलंय. तर संजय गायकवाड यांनी वापरलेली भाषा ही चुकीची असल्याचेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली होती. सगेसोयरेविरोधात मंत्री छगन भुजबळ हे सरकारविरोधातच आक्रमक झालेत. सरकारमध्ये राहून सरकारच्या निर्णयाविरोधात बोलायचं असेल तर मंत्रिमंडळाच्या बाहेर जाऊन बोला, असे म्हणत संजय गायकवाड यांनी टीका केली होती. बघा नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
Published on: Feb 02, 2024 01:29 PM
Latest Videos