ओबीसी राजकीय आरक्षणावर राज्यपालांशी चर्चा झाली नाही : छगन भुजबळ
महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानपरिषदेचे बारा आमदार आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात चर्चा केलीय.
महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानपरिषदेचे बारा आमदार आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात चर्चा केलीय. सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींसाठी राखीव असणाऱ्या जागा खुल्या म्हणून गणल्या जाव्यात असा आदेश दिला आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांना राज्यपालांशी ओबीसी राजकीय आरक्षणावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा केलीय का? असं विचारलं असता त्यांनी चर्चा झाली नसल्याचं म्हटलंय.
Latest Videos