Chhagan Bhujbal Full Speech : जरांगे पाटील यांच्या जालन्यात छगन भुजबळ यांचा हल्लाबोल, काय म्हणाले? ऐका संपूर्ण भाषण

Chhagan Bhujbal Full Speech : जरांगे पाटील यांच्या जालन्यात छगन भुजबळ यांचा हल्लाबोल, काय म्हणाले? ऐका संपूर्ण भाषण

| Updated on: Nov 17, 2023 | 6:05 PM

जालना जिल्ह्यातील अंबड येथे आज ओबीसींचा महाएल्गार बघायला मिळाला. अंबड येथे ओबीसींची महासभा झाली. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज जालन्याच्या अंबड येथे आयोजित ओबीसींच्या एल्गार सभेत मराठा नेते मनोज जरांगे यांच्यावर काय केली सडकून टीका? ऐका संपूर्ण भाषण

जालना, १७ नोव्हेंबर २०२३ : जालना जिल्ह्यातील अंबड येथे आज ओबीसींचा महा एल्गार बघायला मिळाला. अंबड येथे ओबीसींची महासभा झाली. या महासभेला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी संबोधित केलं. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी ओबीसी आमचं आरक्षण खाताय, या मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेवरही भुजबळांनी निशाणा साधला. तर ओबीसींना नेमकं कसं आरक्षण मिळालं यावरही जरांगेना उलगडून सांगितलं. वारंवार म्हटलं जातंय कुणाचं खाताय कुणाचं खाताय… तुझं खातोय का रे…? असे म्हणत छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना सवाल केलाय. याशिवाय “आमची लेकरंबाळं, आमची लेकरंबाळं… मग बाकीच्यांची लेकरंबाळं नाहीत का रे बाबा… भुजबळ दोन वर्ष बेसन भाकर खाऊन आला तुरुंगात, हो आलो. अरे छगन भुजबळ दिवाळीतही बेसन भाकर आणि कांदा फोडून खातो. पण स्व कष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही”, असा हल्लाबोलही छगन भुजबळ यांनी केल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Nov 17, 2023 04:59 PM