द्वेषाने पछाडलेल्या लोकांची सभा; शंभूराज देसाईंचा ठाकरेंवर निशाना
यावेळी देसाई यांनी काय झालं सभेत? फक्त शिवसेनेवरती आणि भारतीय जनता पक्षावरती टीका टोमणेच मारण्यात आले
सातारा : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. या टीकेला याच्याआधी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील सभेवरून ठाकरे यांच्यासह मविआच्या नेत्यांवर टीका केली आहे.
यावेळी देसाई यांनी काय झालं सभेत? फक्त शिवसेनेवरती आणि भारतीय जनता पक्षावरती टीका टोमणेच मारण्यात आले. राज्याचे हिताच्या दृष्टीने काहीच बोलले नाहीत. त्यांच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी काय केलं ते सांगितलं का? काय सांगतिल काही केलच नाही तर. त्यामुळे केवळ आमच्यावरती, शिवसेना, भारतीय जनता पक्षावरती टीका करणारी ही सभा होती. द्वेषाने पछाडलेल्या लोकांची सभा होती, असा घणाघात शंभूराज देसाई यांनी केला आहे.