आजच्या सभेनं मराठवाड्यातील चित्र बदलेलं दिसेल : मनिषा कायंदे
या सभेची दखल विरोधकांना घ्यावी लागेल असे म्हटलं आहे. त्याचबरोबर या सभेनंतर मराठवाड्यातील चित्र बदलेलं दिसेल असेही त्या म्हणाल्या
छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या राजकारणात येथे होणारी मविआची होणारी सभा चर्चेचा विषय ठरली आहे. मविआची ही पहिलीच सभा असून यात होणार कोण काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर वज्रमूठ सभेसाठी उद्धव ठाकरे, अजित पवारांसह नाना पटोले एकाच मंचावर असणार आहेत. यावरून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाने टीका केली आहे. त्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी खडे बोल सुनावले आहेत. तर या सभेची दखल विरोधकांना घ्यावी लागेल असे म्हटलं आहे. त्याचबरोबर या सभेनंतर मराठवाड्यातील चित्र बदलेलं दिसेल असेही त्या म्हणाल्या. तर खेडची सभा असो की मालेगावची, प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सभा या जंगी होत आहेत. लाखांच्या सभा होत आहेत. त्यामुळेच आता भाजप आणि शिंदे गट धास्तावला आहे अशी ही टीका त्यांनी केली आहे.
Published on: Apr 02, 2023 10:47 AM
Latest Videos