दम असेल तर संजय राऊत यांनी कर्नाटकात उध्दव ठाकरेंची सभा घेऊन दाखवावं; कुणाचं चॅलेंज?
Chhatrapati Sambhajinagar News : मला एकवेळ मंत्रिपदाची हाव असू शकतो पण अजित पवारांना मंत्रिपदाची हाव नाही; कुणाचं वक्तव्य? पाहा व्हीडिओ...
छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांना आव्हान दिलं आहे. दम असेल तर संजय राऊत यांनी कर्नाटकात उध्दव ठाकरे यांच्या सभा घेऊन दाखवावं, असं शिरसाट म्हणाले आहेत. संजय राऊतांना जालियनवाला बाग हत्याकांडाचा इतिहास माहिती आहे का? काहीही बोलणे योग्य नाही. कुणीही कोणावर काहीही आरोप करतील. आरोप करण्याची एक प्रक्रिया असते. संजय राऊत सीबीआयकडे गेले असतील तर त्याची होईल. रोज आरोप करणं त्याला अपडेट करणं हे योग्य नाही, असंही शिरसाट म्हणाले आहेत. मुख्यमंत्री लंडनला गेलेले नाहीत. स्वतःचं घर आणि शेती पाहणे ही त्यांची जबाबदारी आहे. मला एकवेळ मंत्रिपदाची हाव असू शकते पण अजित पवारांना मंत्रिपदाची हाव नाही, असंही शिरसाट म्हणाले आहेत.
Published on: Apr 25, 2023 01:01 PM
Latest Videos