इतिहासात पहिल्यांदाच आग्रा किल्ल्यावर शिवजयंती साजरी होणार; 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषानं परिसर दुमदुमला

इतिहासात पहिल्यांदाच आग्रा किल्ल्यावर शिवजयंती साजरी होणार; ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषानं परिसर दुमदुमला

| Updated on: Feb 19, 2023 | 8:23 AM

आग्र्याच्या लाल किल्ल्यावर इतिहासात पहिल्यांदाच शिवजयंती साजरी केली जातेय. आग्रा किल्ल्याच्या ‘दिवाण-ए-आम’मध्ये यंदा प्रथमच शिवजयंती साजरी होतेय. पाहा व्हीडिओ...

आग्रा : आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आग्र्याच्या लाल किल्ल्यावर इतिहासात पहिल्यांदाच शिवजयंती साजरी केली जातेय. आग्रा किल्ल्याच्या ‘दिवाण-ए-आम’मध्ये यंदा प्रथमच शिवजयंती साजरी होतेय.शिवाजी चौक परिसरात फुलांची सजावट करण्यात आली आहे. छत्रपती शिवरायांचे होर्डिंग्स आणि बॅनर लावण्यात आले आहेत . आसपासचा परिसर स्वच्छ करण्यात आलाय. शिवजन्मोत्सव, पोवाडे सादरीकरण, नाटक सादरीकरण, सँड आर्ट आणि आतषबाजीदेखील केली जाणार आहे. हा योग कित्येक दशकांनंतर महाराष्ट्र सरकार आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आल्यानं आनंदाचं वातावरण आहे. आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास अनुमती दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

Published on: Feb 19, 2023 08:23 AM