‘अयोध्येच्या निकालावेळी मी देवापुढे बसलो अन्…’, सरन्यायाधीश चंद्रचूड नेमकं काय म्हणाले?
अयोध्या प्रकरणात निकाल देणाऱ्या घटनापीठात न्यायमूर्ती एस.ए. बोबडे, न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा समावेश होता. या खंडपीठातील न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. पुण्यात बोलत असताना धनंजय चंद्रचूड यांनी एक किस्सा सांगितले.
‘अयोध्येच्या निकालावेळी मी देवांपुढे बसून प्रार्थना केली.’, असं वक्तव्य देशाचे सरन्यायाधीस धनंजय चंद्रचूड यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना केलं. पुण्यात बोलत असताना ते म्हणाले, शेकडो वर्षांपासून रखडलेल्या या प्रकरणावर आम्हालाही मार्ग सापडत नव्हता. पण देवावर आस्था असली की मार्ग मिळतोय, असेही सरन्यायाधीस धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले. ‘जेव्हा अयोध्येच काम माझ्या पुढे आले, त्यावेळी आम्ही तीन महिने अयोध्या प्रकरणावर विचार करत होतो. शेकडो वर्ष अयोध्या प्रकरणावर मार्ग सापडले नव्हता. ते काम आमच्यासमोर आले होते. त्यावेळी आम्हाला कोणाला माहिती नव्हतं यावर मार्ग कसा शोधयचा? पण मी माझ्या दैनंदिन जीवनात माझ्या भगवंताची रोज पूजा करतो. मी भगवंतासमोर बसलो आणि देवालाच सांगितलं अयोध्या प्रकणावर आता तुम्हीच मार्ग शोधून द्या…’, अशी विनंती मी देवापुढे केली असल्याचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले. पुढे ते असेही म्हणाले की, आपली अस्था असेल, आपला विश्वास असेल तर भगवंतच मार्ग शोधून देतात.