AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचा आरे ते कुरार मेट्रोतून प्रवास, Asalm Shaikh यांचीही हजेरी

| Updated on: Apr 02, 2022 | 7:55 PM

मेट्रोला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याच मेट्रोतून प्रवास केला आहे. यावेळी पहिलं तिकीट काढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रोत प्रवेश केला. यावेळी इतर मान्यवरही सोबत होते. यावेळी ही पहिली मेट्रो फुलांनी सजवण्यात आली होती.

मुंबई : आज गुढी पाडव्याला मुंबईकरांना मोठं गिफ्ट मिळालं आहे. कारण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मुंबई मेट्रो 2A, (Mumbai Metro 2A) आणि मेट्रो 7 (Mumabi metro 7) या दोन्ही मार्गिकेचे उद्घाटन झाले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. ऐन उन्हाळ्यात ही मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत आल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मेट्रोला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याच मेट्रोतून प्रवास केला आहे. यावेळी पहिलं तिकीट काढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रोत प्रवेश केला. यावेळी इतर मान्यवरही सोबत होते. यावेळी ही पहिली मेट्रो फुलांनी सजवण्यात आली होती. आरे कॉलनी ते कुरार स्थानकादरम्याने मुख्यमंत्र्यांनी हा प्रवास केला आहे.