मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी एकनाथ शिंदे यांची डिनर डिप्लोमसी; आमदारांसह स्नेहभोजन, कारण नेमकं काय?

| Updated on: Aug 09, 2023 | 10:30 AM

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्व आमदारांना ताज लँडझेंट हॉटेलमध्ये स्नेहभोजनाचं निमंत्रण, कधी असणार डिनर प्लान?

मुंबई, ९ ऑगस्ट २०२३ | आपल्या आमदारांना एकत्रित बांधून ठेवण्यासाठी आणि त्यांच्या संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणाचं आमंत्रण दिलं आहे. या निमंत्रणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डिनर डिप्लोमसीची चर्चा रंगली आहे. ताज लँडझेंट हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांसाठी डिनरचं प्लान केले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या संध्याकाळी ही डिनर डिप्लोमसी होणार आहे. शिंदे यांच्या या डिनरला भाजप आणि अजितदादा गटाचे आमदारही उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर डिनरच्या माध्यमातून आमदारांशी संवाद साधण्याचा शिंदे यांचा हा प्रयत्न असल्याचंही म्हटलं जात आहे. आमदारांशी गप्पा मारणं आणि त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांचं निकारण करणं हा त्यामागचा हेतू असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या डिनर डिप्लोमसीचा हेतू कितपत यशस्वी होतो, आता याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Published on: Aug 09, 2023 10:30 AM
शिवसेना ठाकरे गटाच्या महिला नेत्याकडून नारायण राणे यांचा खरपूस समाचार, ‘त्या’ भाषणावर केली जोरदार टीका
‘मी पंतप्रधानांचा आभारी आहे’, संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे का मानले आभार?