Special Report | … म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३ दिवस सुट्टीवर गेले, बघा काय आहे कारण?
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३ दिवस सुट्टीवर, अचानक सुट्टीवर जाण्याचं कारण काय? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : सत्तानाट्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता असताना आणि राज्यातील सत्तांतरानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवसाच्या सुट्टीवर गेलेत. मुख्यमंत्री अचानक सुट्टीवर गेल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे रंगल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे नेमके सुट्टीवर का गेले? त्याची कारणं काय? तर सत्ताधारी अमदारांनी नेमकी काय भूमिका मांडली? मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे सुट्टीवर जाण्याची ही पहिलच वेळ आहे. दरम्यान, याबाबत एकनाथ शिंदे यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नव्हती. मात्र मिळालेल्या माहितीनुसार २४ ते २६ एप्रिलपर्यंत एकनाथ शिंदे सुट्टीवर आहेत. सुट्टीवर जाण्यापूर्वी शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना साताऱ्यातील आपल्या मूळ गावी जात असल्याचं सांगितले. न्यू इंडियन एक्सप्रेसचे पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्या ट्विटनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवस सुट्टीवर जाणं ही आश्चर्याची बाब आहे. भाजपबद्दल ते निराश असून त्यामुळे ते त्यांच्या मुळ गावी जाऊन पूजा अर्चना करणार आहेत. बघा याबाबतचा स्पेशल रिपोर्ट