एकनाथ शिंदे घेणार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट

| Updated on: Apr 09, 2023 | 8:38 PM

VIDEO | उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या ताफ्यासह लखनऊच्या दिशेने रवाना

अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येच्या दौऱ्यावर असताना त्यांनी संध्याकाळी शरयू नदीची महाआरती करण्यासाठी दाखल झाले होते. शरयू नदी काठी महाआरती केल्यानंतर एकनाथ शिंदे हे लखनऊच्या दिशेने रवाना झाले आहेत. लखनऊ येथे दाखल झाल्यानंतर ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. यामध्ये विशेष म्हणजे अयोध्येत महराष्ट्र भवन उभारण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे यांचा ताफा लखनऊच्या दिशेनं रवाना झाला आहे. दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे यांनी राम मंदिराच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यानंतर त्यांनी लक्ष्मण किल्ल्यावर भेट दिली तेथे पाहणी झाल्यानंतर त्यांनी संध्याकाळी शरयू नदीची महाआरती देखील केली.

Published on: Apr 09, 2023 08:38 PM
‘आठ दिवसात पंचनामे करा,नाहीतर…’, या नेत्यानं दिला राज्य सरकारला इशारा
‘काहीजण माईक हातात आल्यावर…’, अजित पवार यांनी फडणवीस यांच्यावर काय केली टीका?