कलावती बांदूरकर यांनी अमित शाह यांचा 'तो' दावा फेटाळला, कलावती बांदूरकर आहेत तरी कोण? पाहा व्हिडीओ...

कलावती बांदूरकर यांनी अमित शाह यांचा ‘तो’ दावा फेटाळला, कलावती बांदूरकर आहेत तरी कोण? पाहा व्हिडीओ…

| Updated on: Aug 10, 2023 | 3:51 PM

VIDEO | केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करतांना उल्लेख केलेल्या यवतमाळमधील कलावती बांदूरकर आहेत तरी कोण?

यवतमाळ, १० ऑगस्ट २०२३ | बुधवारी अमित शाह यांनी एका गरीब विधवा महिला शेतकऱ्याचा उल्लेख लोकसभेमध्ये केला. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना अमित शाह यांनी कलावती यांचा उल्लेख करताना राहुल गांधींवर निशाणा साधला. बुधवारी संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी यवतमाळच्या कलावती बांदूरकर या शेतकरी विधवा महिलेला काँग्रेसने केलेल्या मदतीच्या संदर्भात जे वक्तव्य केलं होतं, त्यावरून कलावती बांदूरकर या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. तर काँग्रेसने कलावती या महिलेचा उपयोग केवळ राजकीय वापरासाठी केला, कलावती यांना मदत घरकुल, वीज पाणी हे कॉग्रेसच्या नाही तर नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देण्यात आल्याचा अमित शहा यांनी दावा केला. अमित शहा यांच्या या दाव्यानंतर या संपूर्ण संदर्भाने कलावती बांदुरकर यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता भाजपने केलेली मदत धुडकावून लावली. मला जे काही मिळाले ते कॉग्रेसच्या काळात राहुल गांधी यांच्या भेटीनंतर मिळाले. मला भाजप किंवा मोदी यांच्यामुळे कोणतीही मदत मिळाली नसल्याचे यवतमाळमधील कलावती बांदूरकर सांगितले.

Published on: Aug 10, 2023 03:51 PM