Devendra Fadnavis : ‘प्रत्येक गोष्टीत वाद…’, वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून सुरू असलेल्या वादावर सवाल अन् मुख्यमंत्री संतापले
एकीकडे धनगर समाज वेगळा, दुसरीकडे मराठा समाज वेगळा, हे दोन्ही समाज एकमेकांसोबतचे समाज आहेत. त्यामुळे वाघ्या कुत्र्यासंदर्भात वाद घालणं अयोग्य असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
वाघ्या कुत्र्याच्या समाधी संदर्भात सर्वांशी चर्चा करावी लागेल. कारण या स्मारकाकरीता होळकरांनी त्यावेळी पैसे दिले आहेत. त्यामुळे थेट पुतळा काढण्याबाबत समाजात रोष सुद्धा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुढे त्यांनी असेही सांगितले, इतकी वर्षे झाली तो वाघ्याचा पुतळा रायगड किल्ल्यावर आहे. त्यामुळे वाघ्या कुत्र्यासंदर्भातील समाधीचा निर्णय चर्चा करून घेण्यात येईल,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पंढरपूर दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या समाधी संदर्भात पहिली प्रतिक्रिया दिली. दरम्यान, वाघ्या कुत्र्याच्या समाधीसंदर्भात वाद-विवाद करणाऱ्यांना फडणवीसांनी चांगलंच फटकारलंय. ‘प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असे आहे का? असा थेट सवाल त्यांनी केला. या विषयावर वाद करू नये, हे अतिशय अयोग्य आहे. सर्वांनी बसून मार्ग काढावा. उगाच दोन समाज एकमेकांविरोधात उभे झालेले दिसतात. या प्रकरणात बसून मार्ग काढायला हवा असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले.

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट

वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच

जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
