Devendra Fadnavis : ‘शरद पवारांनी पहलमागमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग…’, फडणवीस काय म्हणाले?
पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये २६ जणांचा जीव गेला. दरम्यान, या हल्ल्यावेळी जे महाराष्ट्रातील काही पर्यटक तिथे होते त्यांनी महाराष्ट्रात परताच आपबीती परिस्थिती सांगितली. काहींनी आम्हाला दहशतवाद्यांकडून धर्म विचारला गेला असे सांगितले.
पहलगाम हल्ल्यासंदर्भात बोलताना शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं. ‘पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारला नाही’, असं शरद पवार म्हणाले. या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ‘शरद पवार काय म्हणाले हे मी ऐकलं नाही. पण ज्या हल्ल्यात ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले ते काय म्हणाले हे मी ऐकलं आहे. शरद पवार यांचं तसं मत असेल तर त्यांनी देखील या हल्ल्याच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांकडून ते ऐकावं’, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, पाकिस्ताविरोधात महत्त्वाचे पाच निर्णय घेतल्यानंतर सरकारने या बैठकीचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातील ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रतिनिधी मात्र या बैठकीला उपस्थित नव्हते. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”मला या गोष्टीचे फार दु:ख आहे. देशाचा इतिहास ते विसरले. युद्धाची वेळ असो, देशासंदर्भात कोणताही विषय असो या देशातील पक्षांनी कधीही पक्ष पाहिला नाही. बांगलादेश युद्धाच्या वेळी पक्षांमध्ये टोकाची लढाई सुरू होती त्यावेळी दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिला होता. पण अशा परिस्थिती विरोध करणं मुर्खासारखं वक्तव्य करणं याला देशाची जनता माफ करणार नाही.”

बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड

पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती

विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
