अमित शाहांसमोर 3 गोष्टींवर ठरलं! मिशन लोकसभेला फायदा होईल असे मंत्री होणार?
VIDEO | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं मंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नेमकं काय ठरलं?
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही दिल्लीवारीला गेले होते. यावेळी या दोन्ही नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि यांच्यात दोन तास बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारासह लोकसभेच्या जागा वाटपावर देखील चर्चा झाली. तर आगामी लोकसभा विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब झालं. यासह मंत्रिमंडळाच्या विस्तारावरही चर्चा झाली असून कोणाचे किती मंत्री हेही ठरलं आहे. आगामी निवडणुकांची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केलीये. मविआमध्ये फॉर्म्युल्यावर खलबंत सुरूये तर इतके एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीवारी केलीये. यावेळी आगामी निवडणुकांबाबत रणनिती ठरल्याचे सांगितले जातेय. राज्यातील सर्व ४८ लोकसभेच्या मतदारसंघाचा अमित शाहांकडून आढावा घेण्यात आलाय. जागा वाटपाचा नेमका फॉर्म्युला काय असेल यावर चर्चा झाल्याचंही कळतंय. अमित शाहांसोबत शिंदे-फडणीस यांची झालेली बैठक नेमकी कोणत्या मुद्द्यावर होती. बघा स्पेशल रिपोर्ट