…असा मुख्यमंत्री पहिल्यांदा बघितला, उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल काय?
शेतकरी, लोकांच्या घरादारावर नांगर आणि समुद्रावरती ट्रॅक्टर चालवणारा असा मुख्यमंत्री मी पहिल्यांदा पाहिला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हणत टोला लगावला. तर मी कोणता ट्रॅक्टर चालवला याची माहिती उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा माहिती घ्यावी, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला थेट प्रत्युत्तर दिलं
मुंबई, ११ डिसेंबर २०२३ : समुद्रावर ट्रॅक्टर चालवणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा बघितला, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. शेतकरी, लोकांच्या घरादारावर नांगर आणि समुद्रावरती ट्रॅक्टर चालवणारा असा मुख्यमंत्री मी पहिल्यांदा पाहिला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हणत टोला लगावला. तर मी कोणता ट्रॅक्टर चालवला याची माहिती उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा माहिती घ्यावी, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला थेट प्रत्युत्तर दिलं आहे. मी समुद्रावर जे चालवंल ते बीच कॉम्बर होतं, हे दुर्देव आहे की, उद्धव ठाकरे यांना ट्रॅक्टर आणि बीच कॉम्बरमधील फरक माहिती नाही, असे म्हणत त्यांनी खोचक टोला लगावलाय. BMC च्या तिजोरीवर ज्यांनी जेसीबी चालवला आणि मुंबईच्या विकासावर ज्यांनी बुलडोझर फिरवला त्यांना काय कळणार? असा सवाल करत शिंदेंनी हल्लाबोल केलाय.