मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलर्ट मोडवर, काय उचलली पाऊलं?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलर्ट मोडवर, काय उचलली पाऊलं?

| Updated on: Apr 21, 2023 | 10:01 AM

VIDEO | सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलर्ट मोडवर

मुंबई : राज्य शासनातर्फे जून 2021 मध्ये मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली होती. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यासाठी लागेल ते करू, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर दिली. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री अलर्ट मोडवर असून सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. मराठा आरक्षण समितीतील महत्त्वाचे नेते आणि काही मंत्र्यांना देखील तातडीने मुंबईत बोलावल्याची माहिती मिळतेय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मुद्द्यावर संपूर्ण आढावा घेणार आहेत.

Published on: Apr 21, 2023 10:00 AM