Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jarange Patil Live : आईची जात मुलाला लावा... मनोज जरांगे यांची 'ती' मागणी सरकारने फेटाळली

Jarange Patil Live : आईची जात मुलाला लावा… मनोज जरांगे यांची ‘ती’ मागणी सरकारने फेटाळली

| Updated on: Dec 21, 2023 | 5:33 PM

मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी अल्टिमेटम दिलाय. तर आज सरकारच्या शिष्टमंडळाने देखील जरांगेंशी चर्चा केली. आईकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर मुलालादेखील कुणबी प्रमाणपत्र मिळावं, अशी मागणी यावेळी जरांगेंनी सरकारकडे केली.

जालना, २१ डिसेंबर २०२३ : मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी अल्टिमेटम दिलाय. तर आज सरकारच्या शिष्टमंडळाने देखील जरांगेंशी चर्चा केली. आईकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर मुलालादेखील कुणबी प्रमाणपत्र मिळावं, अशी मागणी यावेळी जरांगेंनी सरकारकडे केली. मात्र ही मागणी राज्य सरकारच्या शिष्टमंडळातील मंत्री गिरीश महाजन यांनी फेटाळून लावली. पत्नी रक्ताच्या नात्यात येत नाही. आई आणि मामा रक्ताच्या नात्यात येत नाहीत. त्यामुळे आई ओबीसी असेल तरी मुलांना ओबीसी आरक्षण देता येणार नाही, असे महाजन म्हणाले तर या व्यतिरिक्त कुणबी नोंदी सापडलेल्या व्यक्तींचा चुलत भाऊ, मुलगी, मुलाला आरक्षण मिळू शकतं, असं गिरीश महाजन म्हणाले. तर नोंदी सापडल्यानंतर मागेल त्याला आरक्षण देण्याचं ठरलेलं. मग आता पात्र व्यक्तींच्या नातेवाईकांना कसं आरक्षण देणार? असा सवाल जरांगे यांनी केला. यावर महाजन यांनी आई, पत्नी, मामा रक्ताच्या नात्यात येत नाही, असं समजावत त्यांना उत्तर दिलं.

Published on: Dec 21, 2023 05:33 PM